MPSC Rajyaseva ( Only Prelims ) Batch Course Start - 31 OCT 2021 Live lecture I recorded lecture Test series (GS + CSAT ) I Interactive sessions Video lecture unlimited access UNIVERSAL FOUNDATION’s Quiz - Terms and Conditions 1. Crash Course दरम्यान 10 GS व 10 C-SAT सराव परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील. सराव चाचणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर (अभ्यासक्रमावर) आधारित असतील. तसेच या सराव चाचण्यांचे वेळापत्रक 1 नोव्हेंबर या दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केले जाईल. 2. गुणवत्ता यादी GS + CSAT या दोन्ही चाचण्यांच्या एकत्रित गुणांकानुसार लावण्यात येईल. ही गुणवत्ता यादी आरक्षणविरहित राहील यांची नोंद घ्यावी. 3. Crash Course दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक सराव चाचणीत प्रथम येणाऱ्या एका परीक्षार्थीला रु. ११ हजार ही बक्षीस रक्कम देण्यात येईल. ही बक्षिसाची रक्कम संबंधित परीक्षार्थींच्या स्वतःच्या बँक खात्यात online पद्धतीने जमा केली जाईल. 4. बक्षिसास पात्र ठरलेल्या परीक्षार्थींच्या बक्षिसाची रक्कम ही त्या परीक्षार्थींच्या स्वतःच्या बँक खात्यातच जमा केली जाईल. अशी रक्कम इतर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही सबबीवर जमा केली जाणार नाही 5. जर एखाद्या सराव चाचणीत प्रथम येणाऱ्या क्रमांकावर एकापेक्षा अधिक परीक्षार्थ्यांना समान गुण प्राप्त झाले तर बक्षिसाची रक्कम त्या परीक्षार्थ्यामध्ये समान प्रकारे विभागून दिली जाईल. सर्व परीक्षार्थींना आपली गुणवत्ता यादी ऑनलाईन पाहता येईल. 6. संबंधित सराव चाचणी ही बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. 7. एका परीक्षार्थीला एक चाचणी फक्त एकदाच देता येईल. 8. राज्यसेवा पूर्व परीक्षेत ज्या प्रकारे नकारात्मक गुण पध्दती वापरली जाते त्याप्रमाणे या सराव चाचणीतही नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाईल. एका चुकलेल्या उत्तरासाठी बरोबर आलेल्या उत्तरांच्या गुणांतून ¼ गुण वजा केले जातील . 9. सराव चाचणी ही ठरलेल्या वेळेतच देता येईल आणि अशा वेळेत बदल करण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही. 10. संबंधित सराव चाचणी ही फक्त एकदाच देता येईल. 11. संबंधित सराव चाचणी ही जास्तीत जास्त निर्दोष बनविण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र संबंधित सराव चाचणीत एखादा किंवा काही प्रश्न सदोष असल्यास सर्व विद्यार्थ्यांना त्या प्रश्नासाठी समान गुण प्रदान करण्यात येतील, तसेच त्या संदर्भात विद्यार्थांच्या कोणत्याही तक्रारी किंवा सबबी स्वीकारल्या जाणार नाहीत 12. परीक्षार्थींना दिल्या जाणाऱ्या बक्षीसाचा उद्देश विद्यार्थ्यांत स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे, ते देत असलेल्या परीक्षेकडे त्यांनी गांभीर्याने पाहावे तसेच होतकरू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 13. संबंधित परीक्षार्थींनी जमा केलेले शुल्क हे संबंधित Crash Course चे शुल्क आहे. सराव चाचणीत दिले जाणारे बक्षीस हे UNIVERSAL FOUNDATION कडून उत्तेजनार्थ दिले जाणार आहे. संबंधित Crash Course ला प्रवेश घेणे म्हणजे बक्षीस प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त करणे नव्हे. त्यामुळे सराव चाचणीत बक्षिसासाठी केला गेलेला कोणताही दावा ग्राहय समजला जाणार नाही. 14. संबंधित सराव चाचणीत प्राप्त केलेल्या गुणांच्या माहिती बाबत फोनद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून केल्या गेलेल्या चौकशीला मान्य केले जाणार नाही किंवा कोणत्याही आधारावर पुनर्मूल्यांकनासाठी केली गेलेली विनंती मान्य केली जाणार नाही. 15. सदर सराव चाचण्यांच्या वेळापत्रकांत व नियमांत बदल करण्याचा युनिव्हर्सल फाऊंडेशनला अधिकार आहे व सर्व परीक्षार्थी त्यास बांधील असतील. 16. युनिव्हर्सल फाऊंडेशन संस्थेचा निर्णय अंतिम राहील.( अटी व शर्ती लागू )